येवल्यात 14 रोजी 'रन फॉर गर्ल चाइल्ड' रॅलीचे आयोजन

येवला -  स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर जनजागृती करण्यासाठी शनिवारी 14
डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता शहरातील टिळक मैदानापासून सदर रॅलीला सुरुवात
होणार आहे. शहराच्या विविध मार्गांवरून रॅली मार्गक्रमण करणार असून, या
दरम्यान जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमात नाशिकचे प्रसिद्ध
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अँथलिट चॅम्पियन अंजना ठमके, संजीवनी जाधव, नगर येथील चळवळीच्या प्रमुख डॉ. सुधा कांकरिया, मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक सुनील कडासने, मनमाडचे विभागीय पोलिस उपअधीक्षक समाधान पवार, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, येवल्याचे तहसीलदार हरीश सोनार
आदींसह अनेक मान्यवर तसेच सर्व विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आदी सहभागी होणार आहेत. आजच्या आधुनिक जगातही स्त्रीभ्रूण हत्या मोठय़ा प्रमाणात होत आहेत हे
दुष्कृत्य थांबवण्यासाठी शासनासोबतच अनेक सामाजिक संस्था नेटाने जनजागृती उपक्रम राबवत आहेत.
मुलींचा जन्मदर घटत चालला आहे हीदेखील चिंताजनक बाब आहे. या गोष्टी थांबविण्यासाठी आणि प्रचार व प्रसारासाठी विद्या एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. सदर उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश पटेल, विश्वस्त डॉ. संगीता पटेल, प्रा. डॉ. महेश अय्यर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
थोडे नवीन जरा जुने