संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत महसूल कर्मचाऱ्यांवरच दलालांना संरक्षण देणेचा समिती अध्यक्षांचा आरोप....

येवला - तहसील कार्यालयातील संजय गाधी निराधार समितीच्या बैठकीमध्ये
महसूल कर्मचारी अडवणुक करीत असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष चंद्रकांत
साबरे यांनी केला. राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग,
शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला,
घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार
अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. संजय गांधी निराधार यांसह
इतर योजनांचा नियमानुसार तपासणी अधिकारी तलाठी असतो. या महिन्यात
झालेल्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजना समिती चे अध्यक्ष
चंद्रकांत साबरे यांनी येवला तहसीलदारांकडे तलाठी कार्यालयात एक राजकिय
पक्षाचा कार्यकर्ता सदर प्रकरणांसाठी दलाली चे काम करीत आहे अशी तक्रार
केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अशोक संकलेचा यांनी याच बाबत वेळोवेळी
प्रांत व तहसीलदार यांचेकडे तक्रारी केल्या आहेत. पण प्रशासन या
कार्यकर्त्याबाबत मौन पाळून आहे. या बाबत अशोक संकलेचा म्हणाले कि
तालुकास्तरीय समितीचे विविध पदाधिकारी वर्षानुवर्षे तेच ते आहे ते
बदलावेत यासाठी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री भुजबळ यांचेकडे वेळोवेळी मी
मागणी केलेली आहे.तसेच गेल्या पंधरा वर्षात या योजनेत कोणाच्या दबावा
खाली तलाठ्यांकडून अनेक अपात्र लाभार्थी घुसवले गेले व ते मंजूर
करणाऱ्यांची चौकशी करावी ही आपली जुनी मागणी आहे.
दरम्यान दलालांचा आधार न घेता लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून
प्रस्ताव तलाठय़ाकडे द्यावा. त्यानंतरही पैशांची मागणी झाल्यास थेट
माझ्याकडे तक्रार करावी.असे आवाहन तहसीलदार हरीश सोनार यांनी केले आहे.
या वेळी समिती सदस्य प्रकाश वाघ, दत्तात्रय देवरे, रईसाबानो मुश्ताक
सय्यद, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, संजय गांधी योजनेचे नायब
तहसीलदार शंकर झाल्टे, आर. बी. शिरसाठ, आर. सी. बोडके उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने