छगन भुजबळ यांना के.वीरमणी सामाजिक न्याय पुरस्कार 2013


येवला - सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य आणि दिलेल्या योगदानाबद्दल अमेरिकेच्या नामांकित पेरियार इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे दिला जाणारा के.वीरमणी सामाजिक न्याय पुरस्कार 2013 सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री तथा अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांना मुंबईत शनिवार, दि. 7 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी राज्यपाल श्री.के. शंकरनारायणन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार मिळविणारे भुजबळ हे महाराष्ट्रातील पहिलेच मंत्री ठरले आहेत. भारतातील ज्येष्ठ समा सुधारक पेरियार ई.व्ही. रामास्वामी यांच्या अमेरिकेतील अनिवासी भारतीय असलेल्या अनुयायांनी स्थापन केलेल्या पेरियार इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पेरियार स्वामी यांच्या विचारानुसार सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष वीरमणी यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, कॉंग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते सीताराम केसरी, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. करुणानिधी, खा.हनुमंता राव यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने