कामगारांचा येवल्यात तहसील कार्यालयावर मोर्चा

येवला -बांधकाम, घरेलू, माथाडी, असंघटित कामगारांसह शेतमजुरांचा विविध
मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
भारतीय ट्रेड युनियन केंद्राच्या वतीने व सीटू नेते डॉ. डी. एल. कराड
यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मनमाडरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
आवारातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सीताराम ठोंबरे, सिंधू शादरुल,
गोरख सुरासे, रणजित संसारे, सखाराम खळे, रेखा कोटमे, शीतल वाघ, करुणा
भावसार, सुनीता बाकळे, अंबिका नागपुरे, अनुराधा भावसार आदी उपस्थित
सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन तहसीलदार हरिश सोनार यांना देण्यात
आले.
थोडे नवीन जरा जुने