नाशिकच्या पिंपळगाव बहुलाचा विपुल नागरे मुंबई क्रिकेट टिमचा कप्तान

नाशिकच्या पिंपळगाव बहुलाचा विपुल नागरे मुंबई क्रिकेट टिमचा कप्तान
(नाशिक):- मुंबई क्रिकेट अॅकेडमीचा कप्तान म्हणून नाशिकच्या पिंपळगाव बहुला येथील विपुल नागरे याची निवड झाल्यामुळे नाशिकचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ आणि खा.समीर भुजबळ यांनी विपुलाचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी त्याचे मार्गदर्शक मुंबई क्रिकेट अॅकेडमीचे सचिन राणे उपस्थित होते. नाशिकच्या विपुल नागरे, लखन बरबडे, ऋत्विक मुळे आणि निखील शिंदे यांची मुंबई टी-२० क्रिकेट टिममध्ये निवड झाली आहे. विपुल ला इंडियन क्रिकेट अॅकेडमीचे मुख्य प्रदेश अधिकारी राहुल आग्रे यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. त्याची कप्तान पदाची कारकीर्द चमकदार राहो आणि इंडियन प्रीमियर कॉर्पोरेट लीग मध्ये प्रवेशाची संधी मिळो अशा शुभेच्छा ना. भुजबळ यांनी दिल्या.
थोडे नवीन जरा जुने