शेतकर्‍यांनी रोखला नगर - मनमाड मार्ग

येवला- येथील बाजार समितीत सोमवारी कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले. त्यानंतर नगर-मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला. गत आठवड्यात कांद्याचे निर्यातमूल्य कमी केल्यानंतर भाव काही प्रमाणातवाढले होते. सोमवारी येथील बाजार समितीत 700 ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली होती. लिलावाला सुरुवात होताच भाव गडगडले. किमान भाव 500 रुपये, कमाल 961 रुपये, तर सरासरी 850 रुपये होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा रोष अनावर झाल्याने लिलाव बंद पाडले. त्यानंतर शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या आवाराबाहेर येत नगर-मनमाड मार्गावर आंदोलन केले.तहसीलदार हरीश सोनार,पोलिस निरीक्षक र्शावण सोनवणे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. याबाबत पालकमंत्र्यांची बोलण्याचे अश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, दुपारी लिलाव पुन्हा सुरुवात होताच प्रतिक्विंटल भाव कमाल 1050 पर्यंत मिळाला.

आंदोलनानंतर 125 रुपयांनी भाव वधारले
थोडे नवीन जरा जुने