छावा संघटनेचा मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

येवला - मराठा समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करून आरक्षणाची र्मयादा वाढवावी, यासाठी शुक्रवारी छावा मराठा संघटनेने प्रदेशाध्यक्ष
विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला. शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर विंचूर चौफुलीवर शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता रास्ता रोकोला सुरुवात झाली. रास्ता रोकोत प्रदेश उपाध्यक्ष योगेश केवारे, प्रवक्ता सुभाष जावळे, प्रदेश कार्याध्यक्ष तानाजी हुसेकर, जिल्हाध्यक्ष संजय जाधव, उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुनील गुंजाळ आदी सहभागी झाले होते. 'कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही', 'मराठा समाजाला
आरक्षण मिळालेच पाहिजे', 'जय भवानी, जय शिवाजी' आदी घोषणा देत छावाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले होते. निवासी नायब तहसीलदार विनायक थविल यांना छावा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
थोडे नवीन जरा जुने