अस्थिरोग व स्त्रीरोग तज्ज्ञांची नेमणूक करा ग्रामीण रुग्णालयातील समस्या; सेनेचे उपोषण

येवला -शहरातील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, भूल व अस्थिरोग तज्ज्ञांची
नेमणूक 15 दिवसांत शासनाने न केल्यास ग्रामीण रुग्णालयास कुलूप ठोकण्याचा
इशारा शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी दिला.
शिवसेनेच्या वतीने मंगळवारी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर विविध
समस्यांप्रश्नी उपोषण करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षकांच्या लेखी
आश्वासनानंतर लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आले.
उपोषणात शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, कल्याणराव पाटील,
रूपेश लोणारी, सर्जेराव सावंत, संजय सोमासे, धीरज परदेशी आदी सहभागी झाले
होते.
थोडे नवीन जरा जुने