संतोष श्रमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.

येवला - (अविनाश पाटील) - तालुक्यातील बाभुळगाव येथील संतोष श्रमिक
माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार
पडले. प्रथमच रात्रीच्या वेळी झालेल्या या चार दिवसाचे स्नेहसंमेलनामध्ये
विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला . विविध सांस्कृतीक
कार्यक्रमावरोबर प्रभाकर झलके यांचे जादूचे प्रयोग, जगन्नाथ निकम यांचे
वऱ्हाड निघालय लंडनला चा एकपात्री प्रयोग यामुळे ५ वी ते १२ वी चे
विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे तसेच समन्वयक प्रसाद
गुब्बी, प्राचार्य गोरख येवले, सेमीचे विभागप्रमुख आप्पासाहेब कदम
यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन व सरस्वतीपुजन करुन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले पोलिस निरिक्षक श्रावण
सोनवणे यांनी तासभर हजेरी लावून चिमुकल्यांच्या कलेला उत्स्फुर्त दाद
दिली. आकांक्षा मोरे ( इ.५ वी), ललित आहेर (इ.१०वी) व अंकित शिंदे (इ.११
वी) या विद्यार्थ्यांची स्टार ऑफ द गॅदरींग म्हणून निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.संतोष विंचू यांनी तर प्रास्ताविक
प्राचार्य येवले यांनी केले.आभार उपप्राचार्य ए.जी.कदम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण पैठणकर, प्रदिप पाटील,मनोज खैरे,रोहिणी
केंगे,स्नेहल कोकणे, मनाली शिंदे,माधुरी साळुंखे यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने