नेऊरगावच्या शितल देशमुखची सैन्यदलात निवड

येवला- (अविनाश पाटील) - आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे.
राजकारण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय या अनेक क्षेत्रात महिला दिसतात . पण
सैन्यदलात हे दिसून येत नाही. येवला तालुक्यातील नेऊरगांव येथे राहणारी
शितल दिलीप देशमुख या मुलीने वेगळी वाट धरून भारतीय लष्कराच्या सीमा
सुरक्षा दलामध्ये आपेल स्थान निर्माण केले.
१२ वर्षांची असताना तीचे वडीलांना अपघाती मुत्यू आला त्यानंतर आईने
मोलमजूरी करुन दोघा मुलांना वाढवले. सैन्यदलात नोकरी करण्याचे ध्येय तीने
मनात ठेवून सैन्य दलात अर्ज केला. महाराष्ट्रातून ५० महिला यासाठी
निवडल्या गेल्या नाशिक जिल्ह्यातून तीची एममेव निवड झाली आहे.
देशसेवेसाठी बीए शिक्षण होऊनही सैन्यातच नोकरी करण्याचे धाडस तीने दाखवले
आहे. तीचे हे धाडस तमाम महिलांना प्रेरणादायी ठरणार असून याच क्षेत्रात
वरीष्ठ पातळीपर्यंत काम करण्याचा मनोदय तीने व्यक्त केला.
तीनशे मुलींच्या खडका कॅम्प पंजाब येथील बी.एसएफ प्रशिक्षण तुकडीत प्रवेश
मिळवुन तीने नुकतेच प्रशिक्षण पुर्ण केले.तीची नेमणुक त्रिपुरा येथे झाली
असून ती पुढील शिक्षण घेत आहे. आपले यश हे आपल्या आईच्या खडतर
प्रयत्नाचे फलित असल्याचेही ती म्हणाली. नेऊरगाव ग्रामस्थातर्फे तीचा
सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच विजय बोराडे,विजय कदम, काकासाहेब
कदम,उध्दव बोराडे,शब्बीर सय्यद, मुख्याधापिका उज्वला मेतकर ,प्रकाश
अहिरे,नानासाहेब कुऱ्हाडे,सुंदरराव हारदे,मंगला गोसावी,सुनिल पवार
यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने