खटपट युवा मंचतर्फे राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन

येवला (अविनाश पाटील) - भारत सरकारच्या युवा कार्यक्रमांतर्गत क्रीडा
मंत्रालय, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी व येथील स्वयंसेवी
संस्था खटपट युवा मंचतर्फे दि. 12 ते 19 जानेवारी 2014 दरम्यान राष्ट्रीय
युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवादिन व स्वामी विवेकानंद यांची जयंती,
युवा सप्ताहाचे उद्घाटन तहसीलदार हरीष सोनार, नगराध्यक्ष नीलेश पटेल,
म्हाडाचेव विभागीय अध्यक्ष नरेंद्र दराडे, मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर,
प्रभाकर झळके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दि. 13 रोजी
सांस्कृतिक दिनानिमित्त प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वामी
विवेकानंद चित्र रंगभरण स्पर्धा, दि. 14 रोजी समाजसेवादिनानिमित्त गोशाळा
मैदानावरील गोरगरिबांना तीळगूळ व वस्त्रदान वाटप, 16 जानेवारी रोजी
शारिरीक क्षमता तथा साहस दिनानिमित्त हळदी कुंकू व तीळगूळ वाटप
कार्यक्रम, तसेच महिला संगठन मेळावा व मार्गदर्शन सांयकाळी 6 वाजता
नामदेव विठ्ठल मंदिरात, दि. 17 जानेवारी रोजी शांततादिनानिमित्त शांतता
संदेश जनजागृती रॅली, मल्लखांब स्पर्धा, दि. 18 रोजी कला कौशल्य
विकासदिनानिमित्त स्लो सायकल, मॅरेथॉन, उंचउडी, तसेच रांगोळी, निबंध
स्पर्धाचे आयोजन, तसेच दि. 19 रोजी जागृतीदिन व युवा सप्ताहाचा समारोप
होणार आहे.

स्पध्रेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार
आहे. सदर स्पध्रेत सहभागी होण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा
युवा समन्वयक भास्कर कोल्हे, खटपट युवा मंचचे अध्यक्ष मुकेश लचके,
कार्यवाह प्रा. दत्ता नागडेकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने