विश्वलता महाविद्यालयाच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

येवला  (प्रतिनिधी अविनाश पाटील)  'गाव स्वच्छ ठेवा आरोग्य सांभाळा, देखणेगाव आवडते गाव'. अशा घोषणांनी महाविद्यालयीन तरुणांनी ग्रामस्थांचे ग्रामस्वच्छेविषयी प्रबोधन केले. निमित्त होते, साईराज शिक्षण संस्थेच्या विश्वलता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे. कोटमगाव येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सुनीता चव्हाण व संस्थेचे सचिव प्रशांत भंडारे यांच्या उपस्थितीत झाले होते. सातदिवसीय शिबिराची सांगता उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या व्याख्यानाने झाली. विद्यार्थ्यांनी भविष्य घडविण्यासाठी अत्यंत जागरूक असले पाहिजे. यात शंकाच नाही. परंतु, त्याचबरोबर सामाजिक जाणीव निर्माण होणे व त्या जोपासल्या जाणेही अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, केवळ पिढी निर्माण होऊन समाजात अराजक माजते, असे होऊ नये, यासाठीच सामाजिकतेची भान असणारा विद्यार्थी घडविण्यासाठी रासेयोचे शिबिर फलदायी ठरते, असे गमे म्हणाले. शिबिरादरम्यान, विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता, वृक्षसंवर्धन व झाडांना कुंपण घालणे या उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमातून समाजप्रबोधन केले. तसेच व्यक्तिमत्त्व विकास, तरुणाई सद्यस्थिती व उपाय, मृदासंवर्धन व वनसंवर्धन, आरोग्य जनजागृती, आजचा विद्यार्थी आणि ताणतणाव व्यवस्थापन आदी विषयांवर डॉ. आर. आर. जोशी, डी. के. हिरे आदींची व्याख्यान झालीत.
थोडे नवीन जरा जुने