येवला : शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्ह्यातील जप्त ५ ग्रॅम ३३0 मिली
वजनाची सोन्याची गोळी, ५१ ग्रॅम ३३0 मिली वजनाची चांदीची लगड फिर्यादी
नानूबाई विनायक कांबळे यांना नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते परत
करण्यात आली.
रहाडी येथील कांबळे यांना शहरातून अज्ञात चोरट्यांनी सिन्नर येथे पळवून
नेवून अंगावरील सोने-चांदीचे दागिने हिसकावून घेऊन पोबारा केला होता. या
प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अधिक तपास करताना
गुन्हेगारांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला होता. पोलीस अधीक्षक
यांचे आदेशान्वये रेझिंग डे निमित्ताने सदर मुद्देमाल शहर पोलीस ठाण्यात
आयोजित कार्यक्रमात कांबळे यांना परत केला.