येवला श्री २०१४ चा मानकरी इगतपुरीचा हितेश निकम

येवला (अविनाश पाटील) - जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत इगतपुरीचा
हितेश निकम याने येवला श्री २०१४ चा पुरस्कार पटकाविला.यावेळी मोस्ट
इम्प्रुव्हड बॉडीबिल्डरचा पुरस्कार समीर पवार याने तर बेस्ट पोझर
पुरस्कार भरत ठाकूर याने पटकाविला. शहरातील धडपड मंच , लक्ष्मीनारायण
बहुउद्देशीय सेवा संस्था,नाशिक जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांचे संयुक्त
विद्यमाने येथील क्रिडा संकुलात जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा मोठ्या
उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकुम ६७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
तरुणांमध्ये बलसंवर्धनाची आवड निर्माण व्हावी म्हणून व व्यायमाबाबत
जागृती व्हावी यासाठी सलग १३ वर्षांपासून जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव
स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. उत्तम प्रदर्शन व उत्तम पोझिंगच्या जोरावर
हितेश निकम याने प्रथम क्रमाकांचा येवला श्री २०१४ पुरस्कार पटकाविला.
कार्यक्रमासाठी नाशिकचे अमित बोरसते,अनिल पाटील,राकेश कुशारे संतोष कहार
यांचेसह शहरातील किशोर सोनवणे, भुषण लाघवे, गौरव कांबळे,तरंग
गुजराथी,दिपक पाटोदकर यांचेसह मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र सातपूरकर
यांनी सुत्रसंचालन केले. पंच म्हणून किशोर सरोदे, नारायण निकम,डॉ.विजय
पाटील,महमंद आसिफ,युसुफ शेख यांनी काम पाहिले.स्टेज मार्शल म्हणून किरण
पवार यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्रभाकर झळके यांनी केले.डॉ.यशवंत
खांगटे यांनी आभार मानले . कार्यक्रमासाठी मुकेश लचके,प्रभाकर अहिरे,मईम
मनियार, महेश खर्डे,महेश कांबळे,श्रीकांत खंदारे,रमाकांत खंदारे,मयुर
पारवे,दत्ता कोटमे,शुभम सुकासे,गोपाळ गुरगुडे,अनिल अहिरे ,ज्ञानेश टिभे
यांनी परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने