प्राच्य विद्यापंडित कॉ.शरद पाटील यांची मुक्तीभूमीला भेट

येवला - (अविनाश पाटील) तथागत गौतम बुध्दानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांनी क्रांतीकारी व विज्ञाननिष्ठ असलेल्या धम्माला सार्वत्रिक
करण्याचा प्रयत्न केला. येवला क्रांतीभूमीवर डॉ.आंबेडकरांनी ही क्रांती
केली . बुध्दाचा विचार सार्वत्रिक करण्यासाठी भारतीय समाजाने झटले
पाहीजे,असे प्रतिपादन प्राच्य विद्यापंडीत कॉ.शरद पाटील यांनी केले.
येवला दौऱ्यावर आलेल्या कॉ.पाटील यांनी शहरातील मुक्तीभूमीला भेट दिली.
मुक्तीभूमीवर सुरु असणाऱ्या विकासकामांची पाहणी करुन त्यांनी समाधान
व्यक्त केेले.जागतिकीकरणात मानवतावाद कोसळत चालला असून चंगळवाद पोसला जात
आहे. आजचा भांडवलदार वर्ग चंगळवादाला खतपाणी घालत आहे. त्यामुळे समाज
मानवतावादाऐवजी हिंसाचार व चंगळतावादाकडे जात आहे. माहिती
तंत्रज्ञानाच्या युगात बौध्द धम्म हाच खरा मानवतावाद देऊ शकतो. अर्थात
बौध्द धम्मात भक्तीमार्ग नसून भक्ती मार्गाने माणसे अंधभक्त होतात.
जगातील मार्क्सवादी अंधभक्त असल्याने युरोपमध्ये समाजवाद कोसळून पडला.
कोरीया,व्हिएतनाम सारखे देश क्रांती करुन उभे राहीले मात्र तेही समाजवाद
उभे करु शकले नाहीत. देशातील जनता समाजवादाची मागणी करीत आहे, मात्र
शासनकर्त्यांना समाजवादात रस नसून भांडवलशाहीत र आहे. जगातील
कम्युनिस्टांना लोकशाही मंजूर नाही तर लोकशाहीची मागणी करणाऱ्यांना
देशद्रोही ठरवीले जात आहे. अशा परिस्थितीत येवल्याच्या क्रांतीभूमीवर
धर्मांतर घोषणेचे एक जागतिक स्वरुपाचे स्मारक उभे राहीले, याचा आपल्याला
आनंद असल्याचे कॉ.पाटील यांनी यावेळी सांगीतले.
कॉ.पाटील यांचे समवेत ज्येष्ठ साहित्यीका "आदोरकार" कॉ.नजुबाई गावित,
कॉ.सिध्दार्थ जगदेव,कॉ.भगवान चित्ते,साहेबराव मढवई,सुरेश खळे,श्रीमती
कलाबाई मोकळ, रोहिणी चित्ते,अस्मिता गायकवाड,पुनम खरात,नानासाहेब
पटाईत,राजेंद्र गायकवाड,अजित मोकळ , देविदास निकम,अॅड.किशोर पगारे,
अण्णासाहेब पटाईत,अॅड.रविराज गोतिस,शिल्पकार बुरुडे आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने