येवल - (अविनाश पाटील) पाटोदा येथील दारिद्रय रेषेखालील पात्र
लाभार्थ्यांना अपात्र ठरविले असा आक्षेप घेत इघे आणि महंत ( बैरागी ) या
कुटुंबीयांनी येवला तहशिल कार्यालयाच्या आवरात दि.२४ फेब्रूवारी रोजी
आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा काल दुसरा दिवस होता.. या कुटुंबाना
सुधारित घरकूल प्रतिक्षा यादीत समाविष्ट करण्यात येईल असे लेखी आश्वासन
पंचायत समिती प्रशासना कडून देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
मात्र हा प्रश्न केवळ २ कुटुंबांचा नसून तालुक्यातील अनेक पात्र
लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आल्याने व यामुळे शेकडो कुटुंबावर अन्याय
झाला, त्यामुळे प्रशासनाने २००२ ते २००७ या कालावधीत दारिद्रय रेषेखालील
व ज्यांचे नाव सध्याच्या घरकूल प्रतिक्षा यादीत नाही अशा तालुक्यातील
सर्व घरकूल वंचितांना पात्र ठरविण्यात यावे अशी मागणी उपोषण कर्ते कैलास
इघे आणि गणेश महंत ( बैरागी ) यांचे वतीने भागवत सोनवणे यांनी गटविकास
अधिकारी अजय जोशी यांचे कडे केली. त्याला प्रतिसाद देत प्रशासनाने
तालुक्यातील सर्वच वंचित लाभार्थ्याचे फेर अवलोकन करण्याचे आदेश दिले
आहेत. प्रतिक्षा यादीत नसलेल्या व फेर अवलोकनात पात्र ठरणार्या
वंचितासाठी तालुक्यातील सर्व ग्रामसभांचे ठराव करण्यात
येतील....ग्रामसभांचे मंजूर ठराव पंचायत समिती मार्फत मा. प्रकल्प
संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , नाशिक यांचे कडेमंजुरीसाठी
पाठविण्यात येतील...
आम आदमी पक्षाने या उपोषणाला सुरूवाती पासूनच पाठींबा दिला होता. सर्वच
राजकीय पक्षाच्या शहर व तालुका पदाधिकार्यांनी व लोक प्रतिनिधीनी उपोषण
स्थळी भेट दिली. आम आदमी चे येवला विधानसभा संयोजक भागवत सोनवणे पहिल्या
दिवसापासूनच उपोषण स्थळी उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने प्रशासनाशी
मध्यस्थी करत ठोस आश्वासना नंतर भागवत सोनवणे व पंचायत समिती प्रशासकीय
अधिकारी सिद्धार्थ पठारे यांचे हस्ते सरबत देवून उपोषण मागे घेण्यात आले.
पंचायत समिती सदस्य रतन बोरणारे व पाटोदा येथील शेकडो ग्रामस्थ या वेळी
उपस्थित होते
आम आदमी करणार ४१०० अतिरिक्त घरांसाठी पाठपुरावा -
"उपोषणा मुळे तालुक्यातील घरकूल वंचितांच्या प्रश्नाला वाचा फुटली
आहे..यामुळे २५०० अतिरिक्त लोकांना इंदिरा आवास योजनेचा फायदा होणार आहे,
त्याच वेळी भटक्या विमुक्त जाती व जमाती साठी असलेल्या यशवंतराव चव्हाण
मुक्त वसाहत योजने चे निकष पुर्ण करू शकणार्या कुटुंबासाठी प्रत्येक
गावातून २० अशा सुमारे १६०० अतिरिक्त घरकुलांसाठी पाठपुरावा करणार आहे.
प्रशासकीय पातळीवर पंचायत समिती विशेष कक्ष उघडण्यात येईल.विस्तार
अधिकारी पवार प्रकल्प समन्वयक म्हणून काम करतील. ग्राम सभांनी पाशवी
बहूमताच्या जोरावर गोर-गरिबांवर अन्याय करायचे थांबवावे " - भागवत
सोनवणे, संयोजक आम आदमी पार्टी येवला.