जिल्हास्तरीय युवा संमेलनात उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार व क्रीडा साहित्याचे वितरण

येवला (अविनाश पाटील) नेहरू युवा केंद्र व खटपट युवा मंचच्या संयुक्त
विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय युवा संमेलनात उत्कृष्ट युवा
मंडळ पुरस्कार व क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. येथील श्रीसंत
नामदेव विठ्ठल मंदिरात हा सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी नेहरू युवा
केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक अतुल निकम होते. त्यांनी केंद्राचा उद्देश
विशद करीत राष्ट्रीय युवा धोरण 2014 या पत्रकांचे वितरण केले. महिला व
बालकल्याण अधिकारी बाळासाहेब पवार, माजी सरपंच गणपत जगताप, युवा
केंद्राचे लेखापाल दयाराम रामटेके, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, माणिक
मढवई यांची मार्गदर्शक भाषणे झाली. केरू तुपसैंदर यांनी सूत्रसंचालन
केले. मुकेश लचके यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. पुरस्काराचे
मानकरी : उत्कृष्ट युवा मंडळाचा पुरस्कार भगूर येथील मातोश्री रमाबाई
आंबेडकर महिला मंडळाने पटकावला. मंडळाच्या अध्यक्षा भारती साळवे यांना
मान्यवरांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन
गौरविण्यात आले.
क्रीडा साहित्याचे वाटप : आदर्श युवा मंडळ, चिचोंडी (लेझीम संच), डॉ.
बाबासाहेब वसतिगृह व शिक्षण मंडळ सोमठाणदेश (थाळी संच), नेहरू युवा
ग्रामविकास मंडळ वाकी बुद्रुक (व्हॉलीबॉल साहित्य) त्याचबरोबर श्री
स्वामी बहुउद्देशीय कला, क्रीडा व सांस्कृतिक संस्था, शिरसगाव लौकी,
साईदिशा सामाजिक संस्था (येवला), श्रीराम शैक्षणिक विकास केंद्र
(लासलगाव), सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था येवला व नेहरू
युवा मंडळ धुळगाव यांना व्हॉलीबॉल नेटचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने