नगरसेविका राजश्री पहिलवान यांनी दिला नगरसेवक पदाचा राजीनामा

येवला (अविनाश पाटील) माजी नगराध्यक्षा ,नगरसेविका राजश्री पहिलवान यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा ना.छगन भुजबळांकडे पाठवला आहे. ना.भुजबळ साहेबांनी येवल्यातील विकासकामे अर्धवट सोडून जाऊ नये अशीही मागणी
त्यांनी केली. तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या पुणेगाव -दरसवाडी कालव्याचे काम, चिंचोडी औद्योगिक वसाहत, शहरातील कोट्यावधीची विकास कामे अश्या अनेक योजना बाकी असताना लोकसभेचा निर्णय रद्द करावा अशीही मागणी त्यांनी केली.
पक्ष श्रेष्ठींनी खा.समिर भुजबळांवर अविश्वास न दाखवता त्यांनाच नाशिक लोकसभेला उमेदवारी द्यावी . त्यांचे तेथील कामे चांगली आहेत. या अगोदर कोणत्याही खासदारांनी केले नाही ते त्यांनी केल्याचेही त्यांनी नमुद केले आहे.
थोडे नवीन जरा जुने