विश्वलता कॉलेजमध्ये सांस्कृतिक महोत्सवातून व्यसनाधीनतेवर प्रबोधन

येवला (अविनाश पाटील) श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्वलता
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
करण्यात आले होते. सहा दिवस चाललेल्या या महोत्सवांतर्गत साडी डे, चॉकलेट
डे, ब्लॅक अँन्ड व्हाइट डे, मिसमॅच डे, पारंपरिक वेशभूषा दिवस आदी डे
साजरे करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची सांगता झाली. त्यात विद्यार्थ्यांनी
नृत्य, गायन, एकांकिका, नाटक आदी प्रकाराच्या माध्यमातून कलाविष्कार सादर
केला. अमोल मोरे, संदीप जठार, नारायण निकुळे, शुभम शर्मा यांनी सादर
केलेले 'व्यसनाधीनता-एक शाप' या विषयावरील भारुड दाद मिळवून गेले. युवा
ही राष्ट्राची संपत्ती असून, ती व्यसनात वाया जाऊ नये, याची काळजी
घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
प्राजक्ता मोकळ हिने 'ही पोली साजूक तुपातली' तर नगाडा या गाण्यावरील
सीमा मिर्शा हिच्या नृत्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अतुल वरे व
कल्याणी वाघमारे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. ज्ञानेश्वर भगुरे यांनी आभार
मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्रशांत भंडारे, विश्वस्त भूषण लाघवे,
उपप्राचार्य डी.के. कदम आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने