शीर्षक नाही

येवला -(अविनाश पाटील) जगदंबा शिक्षण संस्था व महात्मा फुले कृषी
विद्यापीठांतर्गत असलेल्या बाभुळगाव येथील एसएनडी कृषी महाविद्यालयाने
नुकतीच स्पर्धा परिक्षा कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत डॉ.
पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे (अमरावती) संचालक डॉ. प्रा. नरेशचंद्र
काठोळे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षात उत्तीर्ण व्हायचे तर
फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर चौफेर वाचन करावे लागेल. मर्यादित
पुस्तकेच नव्हे, तर समाज, जग वाचावे. वर्तमानपत्र वाचून घटना टिपाव्यात,
अशा टिप्स् अन् अनेक कल्पना तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाल्या.
त्यांनी दिवसभरात स्पर्धा परीक्षांचे तंत्र विद्यार्थ्यांसमोर मांडले. न
घाबरता सभोवतालचे सर्वकाही टिपत गेले तर यश दूर नसल्याचे त्यांनी स्पष्ट
केले. संस्थेचे संचालक लक्ष्मण दराडे म्हणाले की, विद्यार्थी मेहनती
असतात. फक्त त्यांना मार्गदर्शनाची व दिशा दाखविण्याची गरज असते.
त्यामुळे अशा कार्यशाळा संस्था सतत राबवित राहील. प्राचार्य डॉ. एम.ए.
व्यंकटेश यांनीही मार्गदर्शन केले.
थोडे नवीन जरा जुने