येवला नगरपालिका करणार बंदिस्त ट्रॉलीतून कचर्‍याची ने-आण

येवला - (अविनाश पाटील) शहरात गोळा होणारा कचरा उघड्या ट्रक किंवा
ट्रॉलीमधून वाहून नेला जातो. मात्र, त्यामुळे परिसरामध्ये आरोग्याचा
प्रश्न निर्माण होत असल्याने यापुढे बंदिस्त ट्रॉलीमधून कचरा वाहून
न्यावा, असा ठराव नगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत करण्यात आला.
या वेळी स्वच्छता विभागाकडील कामगारांसाठी झाडू, फावडे, पाट्या आदी
साहित्य खरेदी करणे, जंतुनाशक फवारणीसाठी असलेल्या अँपे रिक्षाची
दुरुस्ती तसेच भुयारी गटार योजना या विभागामार्फत राबवण्याबाबत चर्चा
झाली. सध्या शहरातील भुयारी गटार योजना राबवण्याची कार्यवाही सुरू आहे.
त्यामुळे डासांचा त्रास कमी होऊन रोगांना आळा बसणार आहे. सभेस आरोग्य
सभापती मनोहर जावळे, सदस्य उषाताई शिंदे, शेख शबानाबानो, मीना तडवी आदी
उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने