येवला - (अविनाश पाटील) आगामी तीन महिन्यांत नागडे ते नगरसूल रस्ता
दुरुस्त न झाल्यास नागडे, बल्हेगाव, मातुलठाण (ता. येवला) गावातील
ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना पाठविले आहे. नागडे ते नगरसूल
या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे चार ते पाच वर्षांपूर्वी
डांबरीकरण झाले होते. सद्यस्थितीत नागडे-बल्हेगावदरम्यान रस्त्यावर खड्डे
पडले आहेत. ग्रामस्थ व शाळकरी मुले या रस्त्याने पायी व बसमधून प्रवास
करतात. नागडे ते नगरसूलमार्गे मातुलठाण हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा,
असेही निवेदनात म्हटले आहे.