राज्यकर्त्यांच्या उदासिनतेमुळे ८० टक्के पाणी गुजरातला- अपूर्व हिरे

गुजरात व महाराष्ट्राच्या पाणीवाटपावर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी
बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व
उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी बैठकीला जाण्याचे टाळले. गुजरातचे मुख्यमंत्री
असलेल्या नरेंद्र मोदींनी या बैठकीला हजेरी लावत नारपार योजनेचे समुद्रात
वाहुन जाणारे ८० टक्के पाणी करारात गुजरातला नेले यामागे राज्यकर्त्यांची
उदासिनता व मोदींची कार्यतत्परताच कारणीभुत होती असे प्रतिपादन आमदार अपूर्व
हिरे यांनी  यावेळी केले.
आमदार हिरे यांच्या भाजपा प्रवेशाच्या निमित्ताने महायुतीच्या वतीने त्यांच्या
सत्काराचे आयोजन येथील सिध्दार्थ लॉन्सवर करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते
बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नारपार योजना ही काळाची खरी गरज असून या
योजनेचे पाणी आपण भविष्यात जिल्ह्याकडे वळवु शकतो आणि या योजनेसाठी महायुतीची
सत्ता आणणे ही खरी गरज आहे. उत्तर महाराष्ट्राला जलसंजीवनी देणारा
नारपारासारखी पाण्याची मोठी योजना ही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत दुर्दैवाने
मागे राहिली. त्यातच मांजारपाड्याची निर्मिती करुन जिल्ह्यात येवला आणि
मालेगावच्या जनतेत वाद लावण्याचे काम केले जात आहे, असा आरोप आज आमदार हिरे
यांनी येथे केला.
यावेळी डॉ. अपुर्व हिरे यांनी आघाडी सरकारसह जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ
यांच्यावर आपल्या भाषनातुन प्रखर शब्दात टिका केली. दहा वर्षात उद्योगधंदे,
कारखाने, कंपन्या यांनी आणले का, किती युवकांना रोजगार मिळाला. आघाडी
सरकारमधल्या या तथाकथित राज्यकर्त्यांनी दहा वर्षात केवळ जनतेच्या तोंडाला
पाने पुसण्याचीच कामे केली. विकासाच्या नावाने डांगोरा पिटतांना स्वत:चा
स्वार्थ साधण्यापलिकडे काहीच केले नाही असे सांगत आमदार हिरे म्हणाले, आपला
जिल्ह्याचा दौरा सुरु असून विकास हीच एकमेव संकल्पना डोळ्यासमोर ठेवुन
विकासासाठी पाच कलमी कार्यक्रम राबविण्यावर महायुतीच्या सत्ता काळात भर देणार
असल्याची ग्वाही यावेळी दिली. युती शासनाच्या काळात ८० टक्के विकासाची कामे
मार्गी लागली, त्यामुळे  जिल्ह्यात सर्वत्र महायुतीचे आमदार आपणास निवडुन
द्यायचे असून स्थानिकांना निवडुन द्या, असे आवाहनही हिरे यांनी यावेळी केले.
कुणाच्याही दडपणाला भीक घालु नका, काही अडचण आल्यास संपर्क साधा नेहमीच सोबत
राहीन अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली. माजी आमदार मारोतराव पवार यांचे
पुतणे संभाजी पवार यांचा शिवसेना प्रवेशाबद्दल आमदार डॉ. अपुर्व हिरे यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चंद्रकांत शिंदे, दत्ता सानप, भाऊ लहरे, गोरख खैरनार, प्रमोद सस्कर,
संभाजी पवार, धनंजय कुलकर्णी यांची भाषणे झाली. व्यासपीठावर शिवसेनेचे
उपजिल्हाप्रमुख वाल्मीक गोरे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र
लोणारी, भास्कर कोंढरे, भाजपा नगरसेवक बंडू क्षीरसागर, छाया क्षीरसागर, मनोहर
जावळे, रतन बोरणारे, प्रितीबाला पटेल, बबन साळवे, श्रीकांत गायकवाड, सुधाकर
पाटील, अरुण काळे, राहुल लोणारी, शरद लहरे, अमोल सोनवणे, एकनाथ साताळकर,
प्राचार्य शिवानंद हाळे, नानासाहेब पटाईत, माजी प्राचार्य तुकाराम शरमाळे,
नाना लहरे, प्रताप ढाकणे, देवचंद गायकवाड, रवि काळे, सागर उदावंत, विनोद
ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे
जेष्ठ नेते धनंजय कुलकर्णी होते. सुत्रसंचालन आर. डी. शेवाळे यांनी केले तर
आभार उपप्राचार्य भाऊसाहेब गमे यांनी मानले.
थोडे नवीन जरा जुने