अपराजित शंभुराजांचे चरित्र प्रेरणादायी : प्रा. गमे


छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर महाराष्ट्रात एकमेव अद्वितीय, लोकोत्तर राजा झाला ते म्हणजे संभाजीराजे. उणीपुरे आठ वर्षेच सत्ता हाती असतानाही एकही मोहीम, लढाई न हारलेला हा वीरपुरुष या हिंदवी स्वराज्याने पाहिला. आजही शंभूराजांचे चरित्र संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले.
येथील स्वामी मुक्तानंद विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित व्याख्यानात 'संभाजीराजांचे महानकार्य' या विषयावर ते बोलत होते. प्रा. गमे पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य आदर्श होऊ शकेल इतके सार्मथ्य संभाजीराजांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वात होते. धर्माचे पालन करताना आदर्श कर्म कसे करावे, हे शंभूराजांनी शिकविले. मोगल साम्राज्याला सळो की पळो करून सोडले. संपूर्ण स्वराज्याची घडी बसविताना या लोकोत्तर राजाने रयतेसाठी अनेक गोष्टी केल्या. वैश्विक परिवर्तनासाठी संभाजीराजांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या जीवनातील असे एक ना अनेक पैलू प्रा. गमे यांनी उलगडून सांगितले. प्राचार्य बी. बी. रहाणे यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. पी. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. व्ही. धनवटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. 

थोडे नवीन जरा जुने