येवल्याची धनश्री दातीर माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये कोपरगांव तालुक्यात प्रथम...

येवला (प्रतिनिधी) - मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत
शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये इंग्रजी माध्यमातून धनश्री राजकुमार दातीर हीने
कोपरगांव तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. येथील स्वामी
मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्राचे प्रा.डॉ.राजकुमार
दातीर यांची मुलगी असलेली धनश्री कोकमठाण येथे ओम गुरुदेव इंग्लिश मेडीयम
शाळेत शिकत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल प.पू जंगलीदास माऊलींनी धनश्री
दातीर हीचा सत्कार करुन आशिर्वाद दिले. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत
आहे.
थोडे नवीन जरा जुने