ब्राम्हण समाजाचा समावेश ऍट्रॉसीटी कायद्यामध्ये करावा

ब्राम्हण समाजाचा समावेश ऍट्रॉसीटी कायद्यामध्ये करावा
येवला (प्रतिनिधी) - ब्राम्हण समाजासाठी आर्थिक महामंडळासह समाजाचा
समावेश एट्रासीटी कायद्यात करुन समाजाला संरक्षण देणेची मागणी साठी अखिल
भारतीय ब्राम्हण महासंघ व अखिल ब्राम्हण समाज मंडळ येवला यांनी येवला
प्रांत कार्यालयावर मुक मोर्चा काढुन प्रांत वासंती माळी यांना निवेदन
दिले.
ब्राम्हण युवकांना व्यवसायाकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,
पुरोहितांना मासीक पाच हजार रुपये मानधन मिळावे, ब्राम्हण समाजाचा समावेश
ऍट्रॉसीटी कायद्यामध्ये करावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या
आहे. मोर्चात दिगंबर कुलकर्णी, नारायण क्षिरसागर, दिलीप पाटील, श्रीपाद
जोशी, सुभाष शुळ, अनिल गोसावी, राजेंद्र देवगावकर, अरविंद जोशी, हेमंत
धांडे, बाळासाहेब देशमुख, दत्तात्रय शुळ, अमित पाटील, कुशल संत, मंगेश
पैठणकर आदींसह समाज बांधव सहभागी झाले होते.
थोडे नवीन जरा जुने