कांदा विक्रीसाठी आलेला शेतकरी अपघातात ठार

येवला (प्रतिनिधी) शहरातील नगर -मनमाड महामार्गावर झालेल्या अपघातात एक
जण ठार झाला असून १ जखमी झाला आहे. मनमाडकडून कोपरगावकडे जाणाऱ्या आयशर
कंपनीच्या चेसीस वाहनाने कांदा भरलेल्या एपे मिनी ट्रकला ( MH-20
CT-2495) संध्याकाळी ५च्या सुमारास मागून जोरदार धडक दिल्याने एपे मिनी
ट्रक मधील कैलास बाळकृष्ण कदम (३५) रा.बिलवणी ता.वैजापूर हा शेतकरी जागीच
ठार झाला. येवला येथे कांदा विक्रीसाठी कैलास कदम आले होते. कांदा लिलाव
होऊन व्यापाऱ्याच्या खळ्यावर कांदा टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला गाडी
उभी असतानाच आयशर चेसीस ने दिलेल्या धडकेत ते ठार झाले. गंभीर जखमी ला
नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठवलेले आहे. या बाबत येवला पोलिसामध्ये
अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
थोडे नवीन जरा जुने