येवल्यात श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात




येवल्यात श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात

येवला  : पुढारी वृत्तसेवा

येथील शिंपी समाजाच्या वतीने श्री संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री नामदेव विठ्ठल मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता करण्यात येऊन शहरातून भव्य पालखीची मिरवणूक काढण्यात येऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

यानिमित्त मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज सकाळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण, दुपारी महिला मंडळ भजन, सायंकाळी हरिपाठ, सायंकाळी ७ ते रात्री ९ संगीतमय भागवत कथा,रात्री श्रीहरी कीर्तन व भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.समाधी सोहळ्याच्या दिवशी सकाळी ७ वाजता काकडा आरती करून हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. सकाळी १० वाजता सागर महाराज भालेराव,सायगाव यांचे काल्याचे कीर्तन झाले. दरम्यान, सायंकाळी श्रीसंत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची येवला शहरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी सडारांगोळी काढून मिरवणुकीची शोभा वाढविली.

मिरवणुकीत ह.भ.प दीपक महाराज ढोकळे सहभागी होवून भजनाचा कार्यक्रम सादर केला तसेच समाज बांधवांसह बॅण्ड पथकाने जय नामदेव नाव छापलेल्या भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या, तर झांज पथकातील महिलांनी नऊवार साडी परिधान केल्याने मिरवणुकीचे आकर्षण ठरले.मिरवणुकीनंतर मंदिरासमोर दहीहंडीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

याप्रसंगी अध्यक्ष सुहास भांबारे, उपाध्यक्ष नंदकुमार लचके, चिटणीस प्रदीप लचके, अरूण हाबडे,सोमनाथ हाबडे, नंदलाल भांबारे, रवींद्र हाबडे, कैलास बकरे, बळीराम शिंदे, मुकेश लचके,राहुल भांबारे,ज्ञानेशर टिभे, जयवंत खांबेकर, रामेश्वर भांबारे,किशोर राहाणे,योगेश लचके,अरविंद तुपसाखरे,जानकी राम शिंदे,श्रीकांत खंदारे, राजेश माळवे, राजेंद्र कल्याणकर,नीलेश माळवे,राजेंद्र लचके,श्रीहरी भांबारे,निलेश भांबारे,सुदाम सदावर्ते,सागर मोतिवाले, 
प्रेम वारे,राम तुपसाखरे,गणेश लचके,बंडू लचके, संतोष टिथे, प्रकाश खंदारे,प्रसाद खांबेकर,पप्पू खंदारे, प्रमोद लचके, मयूर भुसे, देवीदास भांबरे,पुरुषोत्तम राहणे, विलास भंबारे,विश्वेश टिभे,अरुण पाथरकर, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने