कुत्र्यांच्या हल्ल्यात माकड गंभीर जखमी
येवला | दि. ९ प्रतिनिधी
कुत्र्यांच्या हल्ल्यात माकड गंभीर जखमी झाल्याची घटना अनकाई शिवारातील
गोरखनगर येथे घडली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावात आलेल्या माकडावर
अचानक कुत्र्यांच्या समुहाने हल्ला करुन माकड रक्त बंबाळ केले. माकडाच्या
मांडीला मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या असून पाट व पार्श्वभागालाही
मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहे. या घटनेची माहिती मिळतातच वनपरिक्षेत्र
अधिकारी पी. व्ही. जाधव, वनपाल एन. बी. शुद्रिक, वनरक्षक अनिल गुंजाळ,
वनमजूर व्ही. व्ही. निरभवने आदींनी जखमी माकडाला येवला तालुका पशु
चिकित्सालयात दाखल करुन तेथे अधिक उपचार करण्यात आले. या जखमी माकडाला
गोरखनगर येथील समाज मंदिरात वनक्षेत्र कर्मचार्यांच्या देखभालीत
ठेवण्यात येणार असून नंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती,
वनविभागातील कर्मचार्यांनी दिली.