जनता सहकारी बँकेचा सन २०१४-२०१५ चा लाभांश सभासदांच्या खात्यात जमा- अंबादास बनकर

जनता सहकारी बँकेचा सन २०१४-२०१५ चा लाभांश सभासदांच्या खात्यात जमा- अंबादास
बनकर


येवला | दि. ६ प्रतिनिधी
येथील जनता सहकारी बँकेस दि. ३१ मार्च २०१५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ५५ लक्ष ६६ हजार इतका ढोबळ नफा झालेला असून सर्व तरतुदीनंतर २२ लक्ष ६३ हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक संचालक अंबादास बनकर व चेअरमन नंदकुमार अट्टल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेच्या येवला व पिंपळगाव बसवंत या दोन शाखा असून दोन्ही शाखांमध्ये कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित आहे. ३१ मार्च २०१५ अखेरीस रु. १ कोटी ५७ लक्ष इतके भागभांडवल आहे. बँकेच्या ठेवी रु. ४० कोटी ५२ लक्ष ५६ हजार असून बँकेने विविध स्तरातील व्यवसायिक, शेतकरी यांना त्यांची आर्थिक गरज
भागविणे कामी रु. २६ कोटी ७२ लक्ष ८१ हजार इतके कर्ज वाटप केलेले आहे. बँकेने रु. १३ कोटी ८०
लक्ष २१ हजार इतकी गुंतवणुक केलेली आहे. त्याच प्रमाणे बँकचा रिझर्व्ह फंड रु. १ कोटी ८४ लक्ष ७१ हजार इतका आहे. या वर्षी शेतकरी सतत गारपीट, अवकाळी पाऊस आदींनी ग्रस्त असतांना देखील विद्यमान संचालक मंडळावर विश्‍वास दाखवुन व बँक आपली आहे म्हणून कर्जदार सभासदांनी त्यांचे कडील
कर्जाची थकबाकी वेळेत भरणा केल्यामुळे बँकेची ९६.०३ टक्के इतकी विक्रमी कर्जवसुली झाली असून बँकेची
थकबाकी हि ३.९७ टक्के इतकी राहिली आह.े तसेच बँकेचा ग्रॉस एन. पी. ए. हा ४.३१ टक्के इतका असून निव्वळ एन. पी. ए १.०८ इतका आहे. बँकेचा सी. डी. रेशो हा ६५.९५ टक्के इतका आहे. बँक आरटीजीएस, एनईएफटी सर्व प्रकारचे सरकारी कर भरणा, एक्सिस बँक यांचे माध्यमातून संपूण् भारतात डिमांड
ड्राफ्ट देणे, आदी सेवा देते आहे. ग्राहक, सभासद व ठेवीदार यांना चांगली सेवा देण्यासाठी बँक व संचालक मंडळ कटिबध्द आहे. बँकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी अधिक समर्पित भावनेने काम करीत आहे, असेही
बनकर यांनी सांगितले. तसेच सभासद, ठेवीदार, सहकारी संस्था, संचालक मंडळ, कर्मचारी व अधिकारी आदिंनी मदत केल्याने बँक प्रगती करीत आहे. कर्जदार सभासदांनी त्यांचे कडील कर्जाचे हप्ते व व्याज हे वेळेत भरणा करावा ज्यामुळे आपल्या बँकेची सतत प्रगती होत आहे. बँक स्थापनेपासून बँकेस लेखापरीक्षक वर्ग हा अ मिळालेला आहे. तसेच बँकेचे संचालक व माजी संचालक यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १२ ऑगस्ट रोजी झालेली असता ठराव क्र. ३ नुसार दि. ३१
मार्च २०१५ च्या नफ्यावर सभासदांना ९ टक्के प्रमाणे लाभांश जाहिर करण्यात आलेला आहे. ज्या सभासदांचे बँकेत सेव्हिंग, कर्ज खाते आहे. त्यांच्या खात्यात सदरचा लाभांश जमा करण्यात आलेला आहे. ज्या सभासदांचे सेव्हिंग खाते नाही त्यांनी खात उघडुन घ्यावे अथवा रोख घ्यावा असे आवाहन बँकेचे संस्थापक अंबादास बनकर व चेअरमन नंदकुमार अट्टल यांनी केले. याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन भास्करराव येवले, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण साळुंके व कर्मचारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने