जळगाव नेऊर विकास सेवा संस्था अध्यक्ष पदी विलास घुले तर उपाध्यक्षपदी कैलास सोनवणे बिनविरोध

 


जळगाव नेऊर विकास सेवा संस्था अध्यक्ष पदी विलास घुले ,उपाध्यक्षपदी कैलास सोनवणे बिनविरोध
जळगाव नेऊर - येथील विकास सेवा संस्था अध्यक्षपदी विलास घुले तर उपाध्यक्षपदी कैलास सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आवर्तन पद्धतीने अध्यक्ष पांडुरंग शिंदे, उपाध्यक्ष सिंधुबाई शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर पदाधिकारी निवडीसाठी शनिवार दि.11 रोजी विकास सेवा संस्था कार्यालयात विशेष सभेचे आयोजन सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत अध्यक्ष पदासाठी विलास जगन्नाथ घुले यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी कैलास कारभारी सोनवणे यांचेच अर्ज सादर झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी दोन्ही पदाधिकारी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले. बिनविरोध निवड जाहीर झाल्याने गुलालाची उधळण , फटाक्यांची आतषबाजी व डिजेच्या वाजवून आनंद व्यक्त केला. विलास घुले यांना सुचक नामदेव गायकवाड व अनुमोदन खंडु चव्हाणके यांनी दिले.कैलास सोनवणे यांना सुचक कोंडाजी शिंदे व अनुमोदन जयाजी शिंदे यांनी दिले. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला.
यावेळी विकास सेवा संस्थेच ज्येष्ठ संचालक जयाजी शिंदे, नामदेव गायकवाड, विजय शिंदे, पांडुरंग शिंदे, खंडु चव्हाणके, मच्छिंद्र शिंदे, प्रभाकर शिंदे, कोंडाजी शिंदे, अशोक दाते, राधाकृष्ण कुर्हाडे , सिंधुबाई शिंदे, शांताबाई तांबे, देवेंद्र शिंदे, सचिव शरद पडोळ, मधुकर घुले, उत्तम शिखरे,आबा घुले, दिपक दाते, नवनाथ शिंदे, माधव तांबे, संदिप गायकवाड, शिवाजी घुले, संजय शिंदे, अशोक घुले, गोकुळ शिंदे, माधव घुले, योगेश चव्हाणके, रविंद्र दाते, बाळासाहेब सोनवणे, प्रभाकर घुले, बाबासाहेब गुळे, राजेंद्र पडोळ, राजेंद्र शिंदे, सुरेश वाघ, उत्तम घुले, भाऊसाहेब घुले, रामनाथ घुले, सुनिल मेथे, उत्तम तांबे, डाॅ.जाधव, अंबादास घुले, साहेबराव गायकवाड,   बापूसाहेब वाघ, वाल्मिक शिंदे, विठ्ठल सोनवणे, गोरख शिंदे, भास्कर शिंदे, सोपान भागवत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
 


थोडे नवीन जरा जुने