मुखेड येथे मोफत वंध्यत्व निवारण, लॅप्रोस्कोपी व स्त्रीरोग तपासणी शिबीरास प्रतिसाद


 

मुखेड येथे मोफत वंध्यत्व निवारण, लॅप्रोस्कोपी व स्त्रीरोग तपासणी शिबीरास प्रतिसाद
165 रूग्णांची तपासणी
 
येवला  - वार्ताहर
प्राथमिक आरोग्य केंद्र मुखेड व पॅनासिया हाॅस्पीटल येवला यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य केंद्रात मोफत वंध्यत्व निवारण, लॅप्रोस्कोपी व स्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असता त्यात 165 गरजू रूग्णांची तपासणी वंध्यत्व, लॅप्रोस्कोपी व स्त्रीरोग तज्ञ डाॅ. कविता कुणाल दराडे यांनी केली. यावेळी त्यांनी उपस्थित गरजुंना मार्गदर्शन व प्रबोधन करून माहिती दिली की दिवसेंदिवस वंध्यत्वाचे प्रमाण समाजात वाढत असुन योग्य वेळी रूग्णांनी त्याची ट्रीटमेंट पुर्ण करून घेतल्यास हे प्रमाण कमी होईल.येवला येथे मुंबई पुणे प्रमाणे पॅनासिया म्हणून अद्ययावत सुविधायुक्त असे हाॅस्पीटल सुरू केले असुन माफक दरात वंध्यत्वाच्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत याचा फायदा गरजुंनी घेणे आवश्यक आहे.
यावेळी पॅनासिया हाॅस्पीटल च्या डाॅ.कविता दराडे, मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डाॅ.अशोक बनसोड, जि.प.सदस्या कमल आहेर, सरपंच सचिन आहेर, सरला आहेर, डाॅ.विजय थेटे, डाॅ.वाय.आर.धनवंटे, आरोग्य सहायक जी.एन.मढवई, आर.एस.खैरे, आरोग्य सेवक व्ही.सी.पैठणकर, टी.ए.शेख, एस.ए.गांगुर्डे, श्रीम.पी.ए.वाखरे, एस.एस.देशमानकर, एस.व्ही.पगारे, एस.एस.हीरवे,आर.बी.पोतदार,एस.एल.खारके, सचिन चव्हाण, विनोद चव्हाण, श्रद्धा इसळ, एस.टी.गोरे, कार्यक्षेत्रातील आशा, पॅनासिया हाॅस्पीटल कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
प्रतिक्रिया - धावपळीच्या युगात महीलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यात वंध्यत्वाचे प्रमाण समाजात वाढत आहे. याची योग्य वेळी तपासणी केली तर हे प्रमाण कमी होईल.त्यामुळे ग्रामीण भागात आम्ही पॅनासिया हाॅस्पीटल येवला च्या माध्यमातुन मोफत शिबिराचे आयोजन करून रूग्णांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.
- वंध्यत्व, लॅप्रोस्कोपी व स्त्रीरोग तज्ञ डाॅ.कविता दराडे, पॅनासिया हाॅस्पीटल येवला.
फोटो- मुखेड ता.येवला येथे मोफत वंध्यत्व निवारण, लॅप्रोस्कोपी व स्त्रीरोग तपासणी शिबिर प्रसंगी तपासणी  करताना डाॅ.कविता दराडे, सोबत वैद्यकीय अधिकारी डाॅ.अशोक बनसोड व रूग्ण.
छाया - दिपक आहेर, मुखेड

थोडे नवीन जरा जुने