येवल्यात रंगाचे सामने उत्साहात…..

 


येवल्यात रंगाचे सामने उत्साहात…..
 
येवला - वार्ताहर 
शुक्रवारी  रंगांचे सामने येवल्यात जोशपुर्ण वातावरणात संपन्न झाले.  पहिला सामना सायं. 5 वाजता टिळक मैदान येथे झाला.  सुरुवातीस मनमाड उपविभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, प्रभाकर झळके, नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत टिळक मैदान येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला.  यावेळी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.  त्यानंतर भोलेनाथ लोणारी यांचे हस्ते नारळ  फोडण्यात आले व फटाक्यांची आतीषबाजी व हवेत फुगे सोडण्यात येवुन रंगांच्या सामन्यास सुरुवात झाली.    
यावेळी  सामन्यासाठी तयार असलेला युवावर्ग रंगांचे पिंपासह ट्रॅक्टर घेऊन सामन्यात उतरले व दुतर्फा सुरु झालेल्या ह्या रांगेत परस्परांवर रंग उडवण्यास सुरुवात झाली.  यावेळी हलकडी, ढोल या पारंपारीक वाद्याच्या तालावर अबालवृद्धांनी वयाचे भान विसरुन ठेका धरत ह्या सामन्यांचा आनंद लुटला.  यावेळी काहींनी लाठ्या काठ्या फिरवुन प्रात्यक्षिकेही सादर केली.  डॉ. खाडे यांनी यांनी स्वत। ट्रॅक्टवर उभे राहुन रंग उडवुन  ह्या रंगांच्या सामन्यांचा आनंद लुटला.  यापुढे प्रत्येक वर्षी ह्या रंगांच्या सामन्यात उपस्थित राहणार असल्याचेही डॉ. खाडे यांनी सांगीलते. 
त्यानंतर लगेच दुसर्या सामन्यासाठी युवा वर्ग आपले ट्रॅक्टर घेऊन येथील डी.जी. रोड येथे हजर झाले.  ह्या प्रसंगी नवभारत मित्र मंडळाचे अविनाश कुक्कर यांनी सर्वांचे स्वागत केले व सामन्यास सुरुवात झाली. याठिकाणीही डी.जे.च्या तालावर ठेका धरत हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी सामन्याचा आनंद लुटला.  दोन्ही ठिकाणचे सामने पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.  परिसरातील घराच्या बाल्कनी, गच्ची प्रेक्षकांनी तुडुंब भरल्या होत्या.  ह्या सामन्यांच्या नियोजनाची यशस्वीततेसाठी रंगपंचमी उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.
**************-*********************- ***************-************
रंगपंचमी च्या दिवशी वैशिष्ट्यपुर्ण असलेले रंगाचे सामने खेळण्याची येवलेकरांची जुनी परंपरा आहे.  अशा प्रकारचे सामने भारतात क्वचितच ठिकाणी खेळले जात असावेत परंतु रंगांच्या सामन्याची परंपरा येवल्यात अखंडपणे चालु आहे.   येवल्याच्या रंगांच्या सामन्यांची चर्चा सर्वदुर झाल्याने हर्ष आणि उत्साह युक्त सामने पाहण्यासाठी येवल्यात अनेक ठिकाणाहुन अनेक जण रंगपंचीचे दिवशी येवल्यात अवश्य हजर राहतात. ९० च्या दशकात सामन्यांना मारामारीचे गालबोट लागल्याने ५ ते ६ वर्षांकरिता ही प्रथा खंडीत झालेली होती.  १९९६ मध्ये तात्कालिन नगराध्यक्षा श्रीमती सुंदराबाई लोणारी यांच्या व कै. धोंडीराम वस्ताद तालिम संघाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरु झाली. सध्या ८५ वर्षाच्या असलेल्या श्रीमती लोणारी यांनी त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या हमीपत्रामुळे आजही कोणत्याही वादविवादाविना रंगाचे सामने अखंडीत पणामुळे सुरु आहेत. सामन्यांचे नियोजन प्रभाकर झळके व कै.धोंडीराम वस्ताद तालीम संघ, नवभारत मित्र मंडळाचे अविनाश कुक्कर व शहरातील रंगप्रेमींकडून केले जात आहे.

थोडे नवीन जरा जुने