मोफत नेत्ररोग तपासणी शिबीरात ८० रुग्णांची नेत्र तपासणी

  मोफत नेत्ररोग तपासणी शिबीरात ८० रुग्णांची नेत्र तपासणी
 


येवला - वार्ताहर
 येथील स्वयंसेवी संस्था जनकल्याण सेवा समिती व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक संयुक्त विद्यमाने येवल्यातील सप्तश्रृंगी माता मंदिरात नुकतेच मधुमेही रुग्णांची मोफत नेत्ररोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते.   डॉ. जुही गर्ग यांचे हस्ते श्री सप्तश्रृंगी मातेस पुष्पहार अर्पण करुन शिबीराचे उद्घाटन करण्यांत आले.
कार्यक्रमाचे सुरुवातीस डॉ. जुही गर्ग, डॉ. ई शहा, डॉ. शेखर सोनवणे, डॉ. रमन शौचे, डॉ. सुरेश थोरे, डॉ. राधिका गुरव, कैलास सुरंजे, नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, नगरसेवक प्रमोद सस्कर, ज्येष्ठ नागरीक संघाचे रामेश्‍वर कलंत्री, प्रेस फोटोग्रार चेतन कोळस, मोतीराम पेखळे आदी मान्यवरांचा जनकल्याण समितीच्या  वतीने सत्कार करण्यात आला.   नगराध्यक्ष क्षिरसागर, सस्कर, झळके यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रत्येकाच्या जीवनाध्ये डोळे किती महत्वाचे आहे हे उपस्थितांना पटवुन दिले.  तसेच डॉ. शेखर सोनवणे यांनी मधुमेही रुग्णांना डोळे तपासणी करणे किती गरजेचे आहे, ते न केल्यास रुग्णास होणार त्रास तसेच तपासणी केल्यानंतर डोळ्यांची घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.  शिबीरात सुमारे ८० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.  तसेच काही रुग्णांची शस्त्रक्रीया देखील मोफत करणार असल्याचे उपस्थित डॉक्टरांनी यावेळी सांगीतले. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय नागडेकर यांनी केले तर समितीचे अध्यक्ष नारायण शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी समितीचे दिगंबर कुलकर्णी, नंदलाल भांबारे, किशोर कुमावत, विजय पोंदे, शामसुंदर काबरा, सुनिल चारणे, गोविंदा शिंदे, बाळासाहेब देशमुख, मुकेश लचके, राजेंद्र ताठे, गणेश शिंदे, स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते. 


थोडे नवीन जरा जुने