जागतिक महिला दिन निमित्ताने महिलांना फळ वाटप आणि मतदान नोंदणी अभियान

 


 

  जागतिक महिला दिन निमित्ताने नेहरू युवा केंद्र नाशिक समाजिक विकास बहु उद्देशीय सेवा भावी संस्था येवला यांच्या सयुक्त विद्यमानाने ग्रामीण रुग्णालय येवला येथे महिलांना फळ वाटप आणि मतदान नोंदणी अभियान राबवुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी नेहरू युवा केंद्र समन्वयक भगवान गवाई हे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे होते सूत्र संचालन अश्विनी जगदाळे यानी केले या प्रसंगी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले तसेच क्रांति ज्योत सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आले कार्यक्रमासाठी नगरसेवक अमजद शेख संस्था अध्यक्ष अजहर शाह डॉ सदावर्ते  नायब तहसीलदार आर के मालपुरे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते अजहर शाह यानी सर्वांचे सत्कार केले तसेच संस्थेच्या कामांची थोडक्यात माहीती लोकांना दिली यावेळी कविता आव्हाड या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले तसेच बंडू भाऊ यानी महिलांना आज 50 टक्के आरक्षण असून त्यानी संधीचे सोने करावे वेग वेगळ्या कला कौशल्यातून स्वावलंबी जीवन जगावे तसेच संस्थेच्या वतीने झालेल्या कामा बद्दल संस्था अध्यक्ष अजहर शाह यांचे अभिनंदन केले डॉक्टर सदावर्ते यानी ग्रामीण आरोग्य केंद्रातुंन ज्या सवलती शाशन महिलांना प्रदान करते त्या विषयी थोडक्यात माहीती दिली तसेच ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी यांचे देखील सत्कार त्यांच्या हस्ते  करण्यात आले याप्रसंगी संस्थेच्या वतीने जाभळया रंगाच्या फित बांधून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला तसेच नायब तहसीलदार आर के मालपुरे यांच्या हस्ते मतदान नोंदणी फॉर्म वाटप करण्यात आले भगवान गवई यांनी सामाजिक विकास बहु उद्देशीय सेवा भावी संस्थेला 2015_16 चे जिल्हा स्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार जाहिर केले संस्थेने मागील वर्षात सामाजिक आर्थिक व् शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उत्तम काम केले त्या बद्दल संस्था अध्यक्ष अजहर शाह यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मान केले कार्य क्रमाच्या शेवटी सर्व रुग्णाना फळ वाटप करण्यात आले कार्यक्रमच्या यशस्वीते साठी अश्विनी जगदाळे ,अल्फिया अन्सारी, सुजाता शेलार ,सोनल आहिरे ,पूजा आव्हाड ,कविता आव्हाड रुखसाना शेख आदिनी परिश्रम घेतले कर्यक्रमाच्या शेवटी संस्था अध्यक्ष अजहर शाह यांनी सर्वांचे आभार मानले 



थोडे नवीन जरा जुने