महिला दिनी कन्येला जन्म दिलेल्या मातेचा ज्येष्ठांनी केला सन्मान

 

येवला । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत येथील श्री स्वमी समर्थ ज्येष्ठ नागरीक संघ व जगदंबा महिला ज्येष्ठ नागरीक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनी कन्येला जन्म दिलेल्या आईचा सन्मान करण्यात आला.
महिलांचे हक्कांचे रक्षण तसेच स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने संपुर्ण भारतभर हा महिला दिन साजरा केला जातो.  ह्या महिला दिनी एका कन्येला जन्म दिलेल्या महिलेचा सन्मान  येथील ज्येष्ठांद्वारे करण्यात येऊन नारीशक्तीचा हा उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील एका खाजगी दवाखान्यात तालुक्यातील धामोडे येथील रुपाली समाधान भड ह्या महिलेने महिला दिनी कन्येला जन्म दिला.  त्या मातेचा व कन्येचा सन्मान म्हणुन येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरीक संघ व जगदंबा महिला ज्येष्ठ नागरीक संघाचे वतीने मातेला साडी, चोळी तसेच कन्येला कपडे देवुन सन्मान करण्यात आला.  याप्रसंगी संघाच्या कुसुम कलंत्री, आयोध्या शर्मा, शोभा निरगुडे, उषाताई पाटील तसेच दिगंबर कुलकर्णी, भगीरथ कचरे, दिनकर कंदलकर, शामसुंदर काबरा, अनिल तरटे, अशोक जाधव आदी उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने