पुरणगाव येथील आत्मा मालिकमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

 


 


पुरणगाव येथील आत्मा मालिकमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
 येवला - वार्ताहर

 पुरणगाव ता.येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरूकुलात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध स्पर्धा, उपक्रमात मिळविलेल्या प्राविण्यामुळे विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
यावेळी गुरूकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे, प्राचार्या विद्या सांगळे, उपप्राचार्या आरती मनमाडकर, सचिव उर्मिला गिरमे, कार्यालयीन अधिक्षक प्रमोद शेलार, रामभाऊ झांबरे, नानासाहेब जुगृत, हेमंत शहा, उपसरपंच बाळु ठोंबरे, भिसे, संत सेवादास महाराज, कंकाली महाराज, पालक, ग्रामस्थ, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटोखाली- पुरणगाव ता.येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरूकुलात सांस्कृतिक कार्यक्रमात दंग चिमुकले.थोडे नवीन जरा जुने