गणेशपुर येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

  गणेशपुर येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे  


येवला । तालुक्यातील गणेशपुर (सुकी) येथे भगवान शंकर, पिंड, नंदी, विठ्ठल रुख्मिणी व संत जनार्दन स्वामी यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा १५ मार्च रोजी होणार आहे.  त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे.  
गदगुरु जनार्दन स्वामी  मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने उत्तराधिकारी श्री श्री १००८ महांडलेश्‍वर स्वामी शांतिगिरीजी महाराज व महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने तालुक्यातील गणेशपुर (सुकी) येथे आयोजीत मुर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त ता. १२ मार्च रोजी ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव), ता. १३ मार्च रोजी ह.भ.प. वाल्मिक  महाराज टाकळीकर,  व १४ मार्च रोजी ह.भ.प. संदिपान महाराज (बाजाठाण आश्रम) यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यांत आले आहे.  तसेच कार्यक्रम कालावधीत दररोज पहाटे काकडा भजन, दुपारी यज्ञपुजा, सायंकाळी हरिपाठ व रात्री किर्तन असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.  ता. १५ मार्च रोजी पालखी मिरवणुक होऊन स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत मुर्ती प्राणप्रतिष्ठा, प्रवचन व महाप्रसाद होणार आहे.  तरी भाविकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

थोडे नवीन जरा जुने