विद्या इंटरनॅशनल स्कूलने केला सावित्रीच्या लेकींचा गौरव .....

 


विद्या इंटरनॅशनल स्कूलने केला सावित्रीच्या लेकींचा गौरव .....

 

आज जागतिक महिला दिनानिमित्त विद्या इंटरनेशनल स्कूल ने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या महिलांचा सम्मान केला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. पुढे १९७५ हे वर्ष युनो ने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्रीयांच्या समस्या ठळक पने समाजासमोर येत गेल्या. स्रिया बोलत्या होण्यास सुरवात झाली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परीस्तीतीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले. आता बँका, कार्यालये, तसेच काही काही घरांमधूनही महिला दिवस साजरा होत आहे.

      आज संपूर्ण विश्वात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. या दिवशी अशा कर्तबगार महिलांचा सन्मान केला जातो आणि म्हणूनच विद्या इंटरनेशनल स्कूलने देखील समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला. या वेळी सौ. अंबरबेन गुजराथी (आई शिवन क्लास संचालिका) यांनी अनेक महिलांचे सबलीकरण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यास मदत केली. सौ. राजश्रीताई राउत यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून अनेक महिलांना मार्गदर्शन केले. सौ. कुसुमताई कलंत्री यांनी अध्यात्मिक क्षेत्राद्वारे अनेक महिलांना एकत्रित आणले. कु. उषाताई सरोदे (परिचारिका) या वैद्यकीय क्षेत्रातून अनेक रुग्णांना आपली सेवा देण्याचे उत्तम कार्य करत आहे. सौ. सुधाताई कोकाटे (संचालिका मायबोली कर्णबधीर विद्यालय येवला) यानी समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक महत्वाचे पाउल उचलून अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. सौ. रक्षाताई बेदमुथा यांनी मनमाड या शहरात अनेक स्रियांना आपल्या छत्रछायेखाली काम करण्याची संधी देऊन त्यांचे सबलीकरण केले. सौ. सुवर्णाताई जगताप (सभापती – कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ) यांनी गणेश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दुष्काळात पाणी वाटप करून समाजसेवा केली. सौ. रंजनाताई पाटील (सदस्य – निफाड पंचायत समिती ) यांनी बचत गटामार्फत समाजात अनेक स्रियांना एकत्र आणून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. सौ. नंदाताई डमरे (सदस्य - लासलगाव दक्षता समिती ) समाजात होणार्र्या अनुचित प्रकारांची दक्षता घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याचे एक महत्वाचे सामाजिक कार्य करत आहे. सौ. कांचनताई मागजी या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी महत्वाचे कार्य करत आहे.

       अशा या सर्व समाजसेवी महिलांचा सन्मान रोपटे व सन्मानपत्र देऊन शाळेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल, सौ. शुभांगी शिंदे व सौ शुभांगी रांजणकर यांनी केला. या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कु. आस्था पटेल, कु. साक्षी वाणी व कु. पार्थ शिंदे यांनी महिलांवर आधारित कविता सादर केली. व इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी स्रीयांच्या समस्सेवर आधारित नाटिका सादर केली.  

      यावेळी सौ. सुधाताई कोकाटे, सौ. कुसुमताई कलंत्री, सौ. रक्षाताई बेदमुथा, सौ. सुवर्णाताई जगताप. सौ. कांचनताई मगजी यांनी आपल्या वीचारातून समाजात असणारे स्रियाचे स्थान, त्यांच्या समस्या, त्यावरील विविध उपाय, व महिला सबलीकरणासाठी आपले अनमोल विचार व्यक्त केले.

      यावेळी शाळेचे संथापक डॉ. राजेश पटेल, श्री. अर्जुन कोकाटे, श्री. शिवाजी साताळकर, श्री. दिनेश बेदमुथा, सौ शुभांगी शिंदे, आदी उपस्तीत होते. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. व सौ. रागिणी गुप्ता यांनी सूत्रसंचालन केले.


थोडे नवीन जरा जुने