जागतिक महिला दिन निमित्ताने येवला केमिस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिन निमित्ताने येवला केमिस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान

येवला - वार्ताहर  

८ मार्च हा जागतिक महिला दिन  निमित्ताने येवला केमिस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे शासकीय विश्रामगृह येवला येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या निमित्ताने नाशिक जिल्हा औषध निरीक्षक श्रीमती वर्षा चौधरी या उपस्थित होत्या

 येवला केमिस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे एका छोटेखानी कार्यक्रमात  श्रीमती वर्षा चौधरी ( जिल्हा औषध निरीक्षक ),डॉ संगीता पटेल ,डॉ पायल चंडालिया ,डॉ दिपाली क्षत्रिय,डॉ कविता दराडे,डॉ श्वेता चंडालिया यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच येवला तालुक्यातील औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट म्हणू काम करणाऱ्या  महिलांचा देखील सत्कार करण्यात आला  या वेळी  डॉ संगीता पटेल बोलताना येवला केमिस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे प्रथमच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केल्याने असोसिएशन चे आभार मानले  तसेच महिला दिन निमित्त बोलताना वैद्यकीय क्षेत्रात महिलां पुरुषांच्या बरोबरीने आपलेघर सांभाळून दुहेरी भूमिका कशी पार पडतात हे देखील आवर्जून सांगितले  सत्कार समारंभाच्या वेळी येवला केमिस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोसिएशन चे जिल्हा सदस्य रवी पवार यांच्या सह येवला अध्यक्ष श्री महेंद्र बाफना उपाध्यक्ष राजू घोटेकर,सेक्रेटरी मंगेश गाडेकर सचिन पाटील यांच्या सह असोसिएशन चे अरुणबापू काळे, राकेश भांबरे,शैलेश काबरा,शिवदास सोनवणे,सचिन पटनी,शशिकांत खैरनार,पंकज शाह.मनीष गुजराथी, किरण अभंग यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते

 

 

 
थोडे नवीन जरा जुने