विद्या इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची “पॉवर लूम” ला भेट

 


विद्या इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची  "पॉवर लूम" ला भेट

येवला शहर जसे पैठणी साठी प्रसिद्ध आहे तसेच ते आणखी एका गोष्टी साठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील उपरणे बनवणारे पॉवर लूम. विद्यार्थांना या गोष्टीची माहिती व्हावी यासाठी तसेच ते कसे बनवले जाते याची माहिती व्हावी यासाठी येथील विद्या इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पॉवर लूमला भेट दिली.

हे बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल , तो कसा विणला जातो तसेच त्यावर केले जाणारे जरी काम, जी पारंपारिक मशिनरी त्यासाठी वापरली जाते तिची सर्व माहिती विद्यार्थ्यांना या भेटीतून मिळाली.विद्यार्थ्यांनी  देखील त्यांना वेग वेगळे प्रश्न विचारून आपली उस्तुक्तेला नवी उभारी दिली.

 कपडा तयार होताना कच्चा माल कोणकोणत्या प्रक्रियेतून जातो व शेवटी कपडा कसा तयार होतो हे मुलांनी प्रत्यक्ष पहिले. तसेच या ठिकाणीच मुलांनी साडी वर केली जाणारी हस्तकला देखील बघितली हस्तकला करणारे कामगार यांना प्रश्न विचारले तसेच स्वतः हस्तकला करून ती समजून घेतली.हि शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात अतिशय महत्वाची भूमिका बजावेल. विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. व त्या सर्व प्रश्नांचे निराकरण होणे हे अतिशय महत्वाचे असते. त्यासाठी त्यांना शिक्षक तसेच पालक जसा आकार देतील तसे मुले हे घडत जातात. या गोष्टीची विद्या इंटरनेशनल स्कूलला प्रकर्षाने जाणीव आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या जाणीवा  परिपूर्ण व समृद्ध व्हाव्यात यासाठी स्कूल तर्फे अशा भेटी वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्या जातात. पॉवर लूम मधील सर्व  कारागीर  व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


थोडे नवीन जरा जुने