महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत वंध्यत्व निवारण,हाडाचा ठिसूळपणा,चरबी तपासणी शिबीर

 

महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत वंध्यत्व निवारण,हाडाचा ठिसूळपणा,चरबी तपासणी शिबीर

डॉ.कविता दराडे यांची माहिती - येवल्यात दिवसभर तज्ञ करणार मार्गदर्शन व उपचार


येवला | दि. ६  प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील पॅनिसिया हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत वंधत्व निवारण, लॅप्रोस्कोपी, हाडाचा ढिसुळपणा, शरिरातील चरबीचे प्रमाण व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता दराडे यांनी दिली. शिबिरा संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. 

महिलादिनी महिलांसाठी शहरात अनेक सामाजिक उपक्रम होणार आहेत. मात्र, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महिलांनी दक्ष राहावे या हेतुने हॉस्पिटलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे विशेष शिबिर होणार असून सर्व तपासणी मोफत केली जाणार आहे. आहारातील असमतोलपणामुळे ४० टक्के महिलांमध्ये कॅल्शिमची घनता कमी असून पाहिजे त्या प्रमाणात व पाहिजे त्या वेळेत आणि पाहिजे तेवढा आहार महिला घेत नाही. या संदर्भात तपासणी करुन महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हाडाचा ढिसुळपणा हे देखील महिलांमधील एक समस्या असून वेळेत उपचार झाल्यास ते नियंत्रणात आणणे शक्य असल्याने या शिबिरात उपचार करण्यात येणार आहे. महिलांच्या शरिरातील चरबी देखील शरिर व वजन यांच्या तफावतीनुसार असायला हवी. अन्यथा महिलांना अनेक अडचणी भेडसावतात. त्यामुळे ही तफावत शोधुन वजन वाढवणे व कमी करण्यासंदर्भात देखील शिबिरात उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे डॉ. दराडे यांनी सांगितले. याशिवाय विविध कारणांनी असलेले वंधत्व, लॅप्रोकोपी शस्त्रक्रिया या संदर्भात देखील मार्गदर्शन करुन रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या हेतुने या शिबिराचे खास महिलांसाठी आयोजन करण्यात आले असल्याने शहर व तालुक्यातील महिलांनी या मोफत होणार्‍या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन दराडे यांनी पत्रकार परिषदेत केले. येवल्यासारख्या ठिकाणी महिलांची वंध्यत्व उपचाराची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथे अद्यायावत टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरु केले असून लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया महिलांच्या विविध आजारावरती करुन अद्यायावत उपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. येथील रुग्णांना वेळ प्रसंगी रक्ताची गरज भासल्यास नाशिक येथे जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये लवकरच रक्त साठवणुक केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. दराडे यांनी दिली. येथील रुग्णांना अल्प दरात रक्त उपलब्ध करुन देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. 



  
थोडे नवीन जरा जुने