येवल्यात शासकिय तुर खरेदीला प्रारंभ

 


येवल्यात शासकिय तुर खरेदीला प्रारंभ.... ....     
                                                          
  येवला : प्रतिनिधी 


तालूका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातुन आधारभुत किंमत योजनेअंर्तगत शासकिय तूर खरेदीचा शुभारंभ जिल्हा मार्केटिंग आधिकारी व्हि.एस. इंगळे यांच्या हस्ते येवला न.पा. राष्ट्रवादी कॉग्रेस गटनेते डॉ. संकेत शिंदे, जगदंबा एज्यूकेशन सेक्रेटरी कुणाल दराडे, जि.प. सदस्य संजय बनकर, युवा नेते आकाश पवार, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर यांच्या प्रमुख उपस्थीतीत खरेदी विक्री संघ कार्यालय , मार्केट यार्ड येवला येथे संपन्न झाला.

नाशिक जिल्ह्यात चार तूर खरेदी केंद्रांना मान्यता असुनही जाचक अटी व अवास्तव कामांमुळे कुठेही अद्याप जिल्ह्यात तूरखरेदीला सुरूवात झालेली नसताना येवला तालूक्यातील तुर उत्पादक शेतकरी हितासाठी येवला खरेदी विक्री संघाच्या वतीने खरेदीस प्रारंभ झाला आहे. ऑनलाईन नोंदणीधारक तूर उत्पादकांची ५४५० रुपये प्रति क्विंटल दराने एकरी ५ क्विंटल प्रमाणे मोजमाप होणार आहे.                           

या वर्षापासुन प्रथमच उडिद, मुग, सोयाबिन, खरेदीला मिळालेली परवानगी, मकाची झालेली विक्रमी खरेदी, संघाची सुधारलेली आर्थिक स्थिती या विषयी कृणाल दराडे , डॉ. संकेत शिंदे, संजय बनकर, आकाश पवार यांनी आपल्या मनोगतातून खरेदी विक्री संघाच्याकामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून संघाच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.         

जिल्ह्यात इतरत्र शासकिय तुर खरेदी केंद्र सुरू करण्यास उत्सुकता नसल्याने जिल्हयातील सर्व तूर येवला खरेदी केंद्रामार्फत खरेदी होण्याची मागणी अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी केली असता नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही तुर उत्पादक शेतकऱ्याने आपला माल येवला केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुन तूर विक्री करण्यास जिल्हा मार्केटिंग आधिकारी व्हि.एस. इंगळे यांनी तात्काळ मान्यता दिली.             

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नाना शेळके,दामु पा. पवार, शिवाजी धनगे, राजेंद्र गायकवाड, जनार्दन खिल्लारे, भागुजी महाले, दगडू टर्ले, दिनेश आव्हाड, दत्ता आहेर, सुरेश कदम, त्र्यंबक सोमासे ,कृउबा सचिव डि.सी. खैरणार व्यवस्थापक बाबा जाधव आदि उपस्थीतीत होते.


नोंदणीधारक ४०९ शेतकऱ्यांची २३४३३ क्विंटल मकाची खरेदी आजपावेतो झाली असुन २४ जाने.अखेर मका विक्री केलेल्या ३५४ शेतकऱ्यांचे पेमेंट खात्यावर वर्ग करण्यात आले आहे
भागुनाथ उशीर
अध्यक्ष : खरेदी विक्री संघ येवला

थोडे नवीन जरा जुने