एन्झोकेम विद्यालयात अनोखे रक्षाबंधन साजरे



एन्झोकेम विद्यालयात अनोखे रक्षाबंधन साजरे 

येवला : प्रतिनिधी
येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयात विद्यार्थ्यांनी  झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला. वृक्षसंवर्धन हि काळाची गरज आहे. बहिण भावाला राखी बांधून आपल्या संरक्षणाची जबाबदारी टाकते. त्याच पद्धतीने वृक्षांची लागवड आणि त्याचे संवर्धन ही जबाबदारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी उचलण्याचा संकल्प यावेळी केला.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक पी एन सोनवणे यांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या झाडांना बांधण्यात आल्या. व या झाडांची संवर्धनाची शपथ यावेळी विद्यार्थी व विद्यार्थ्यिनीनी घेतली.  
यावेळी प्राचार्य दत्ता महाले, पर्यवेक्षक किशोर जगताप, सांस्कृतिक प्रमुख दत्ता उटावळे, पी.एन.सोनवणे यांच्यासह  विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  
=======================================

बेसुमार वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा असमतोल वाढला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून दुष्काळासारख्या 

संकटाचा सामना करावा लागत आहे. बेसुमार वृक्ष तोडीमुळे आपण वेळीच जागरूक झालो नाही तर याचे मोठे परिणाम होऊ 

शकतात. याची जाण ठेवत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षांनाच राखी बांधली.

दत्ता महाले, 

प्राचार्य 

एन्झोकेम विद्यालय, येवला 

==============================================
फोटो कॅप्शन - एन्झोकेम विद्यालयात वृक्षांना राख्या बांधताना विद्यार्थिनी समवेत शिक्षक 
   
 

थोडे नवीन जरा जुने