जनकल्याण सेवा समिती तर्फे प्रेमाचे अतूट बंधन रक्षाबंधन उत्साहात...
जनकल्याण सेवा समिती तर्फे प्रेमाचे अतूट बंधन रक्षाबंधन उत्साहात.............
 येवला : प्रतिनिधी
प्रेम आणि इच्छा असून सुद्धा अनेक कारणांमुळे रक्षाबंधना करता भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे जाऊ शकत नाही. काहींना आर्थिक अडचणी असतात तर काहींना घरगुती समस्यांमुळे तर काहींना रोजगार बुडेल या कारणाने राखी बांधण्याकरता जाता येत नाही. म्हणूनच येवल्यातील जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे गेल्या १७ वर्षांपासून खेड्यापाड्यांवर जाऊन कष्टकरी भगिनींच्या  हातून राखी बांधून घेऊन त्यांना भावाची भेट म्हणून साडीचोळी भेट देण्यात येते या वर्षी समितीचे सर्व सदस्य विठ्ठलाचे कोटमगाव  येथील वस्तीवर जाऊन हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. याप्रसंगी उपस्थित भगिनींना साडीचोळी समितीतर्फे भेट देण्यात आली. याप्रसंगी प्र मुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, श्यामसुंदर काबरा, बाळासाहेब पाटोदकर, मुकेश लचके, दिगंबर कुलकर्णी, गणेश शिंदे, सुरजमल काबरा, शशिकांत मालपुरे, विजय पोंदे, सदस्य नंदलाल भांबारे, किशोर कुमावत, किरण शिंदे, प्रभाकर आहिरे, सुधाकर भांबारे,राजू ताठे, विकी शीकलकरी,दत्ता आहेर,अमोल निकम,तसेच  गावाचे सरपंच सोनाली महेश कोटमे,अनिल माळी,प्रकाश ढमाले,नवनाथ ढमाले,रामदास भुजाडे,दिलीप माळी,मनोहर बर्डे आदी गावातील मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते
 
 

थोडे नवीन जरा जुने