टोमॅटो झाला मातीमोल


टोमॅटो झाला मातीमोल

येवला : प्रतिनिधी

 कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारा टमाटा ही कवडीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. शेतीकरण्यापेक्षा मजूर म्हणून काम केले तर कर्जाशिवाय जगता येईल शिवाय बँकाही वसुलीसाठी दारात उभ्या रहाणार नाही अन आत्महत्या करण्याची वेळही येणार नाही.भीक नको पण कुत्र आवर अशी काहीशी परिस्थिती कांदा व टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर या शासनाने आणली आहे हेच का आमचे अच्छे दिन असा उपहासात्मक प्रश्न शेतकऱ्यांची नवीन पिढी विचारू लागली आहे मोठ्या कष्टाने प्रसंगी पाणी विकत आणून,हजारो रुपयांची औषधांची फवारणी करून संपूर्ण कुटूंबासह काबाडकष्ट करूनही प्रति कॅरेटला ५० ते ६० रुपयांचा भाव मिळतो त्यात प्रती कॅरेट २० रुपये भाड्यापोटी खर्च होतात शिल्लक राहिलेल्या २० रुपयापैकी शेकडा १० टक्के रक्कम आडत,हमाली यासाठी खर्च होते उर्वरीत रकमेत मजुरीची रक्कमही देता येत नसल्याने मजुरांसाठी द्यावी लागणारी रक्कमही आता कर्जरूपाने उभी करण्याची वेळ बळीराजावर  आली आहे जर मजुरांना द्यावी लागणारी रक्कम उपलब्ध नाही झाली तर रक्कम आणावी तरी कुठून अन रक्कम नाही जमली तर फाशी घ्यावी काअसा यक्ष प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे मोठ्या काबाडकष्टाने उभी केलेल्या पिकाच्या उत्पादनास भांडवलापोटी केलेला खर्चही वसूल होतो की नाही असा प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा ठाकला आहे एकीकडे कांद्याला भाव नाही चाळीत असलेला कांदा सडायला सुरवात झाली आहे भाव वाढेल या आशेपोटी हा कांदा चाळीत अजून तसाच असल्याचे चित्र दिसत आहे कांद्याला नाही तर किमान नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टमाट्यालाही भाव मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना टमाटे पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे येवला तालुक्यातील पाटोदा,विखरणी,विसापूर,आडगाव रेपाळ,कानडी,गुजरखेडे,तांदुळवाडी सह संपूर्ण तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात टमाटोच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली गत वर्षी मका पिकाला भाव नसल्याने मका पिकाला कंटाळून शेतकऱ्यांनी यंदा टमाटो पिकाची वाट धरली पण आता या पिकानेही दगा दिल्याने शेतीत उत्पादन करावे तरी काय अन कसे हेच सुचेनासे झाल्याची प्रतिक्रिया नवनाथ पगार या शेतकऱ्यांने व्यक्त केली आहे.टमाटा हे पीक कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या पिकाकडे वळला आहे मात्र आता या पिकालाही कवडीमोल भाव मिळत असल्याने भांडवलासाठी घेतलेले कर्ज फेडावे कसे असा प्रश्न सतावतो आहे अशीच परिस्थिती राहिल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे उद्विग्नता शेतकऱ्यांच्या तोंडून व्यक्त होत आहे येवला,लासलगाव येथील मार्केट मध्ये टमाटा व्यापारी काही प्रमाणात दाखल झाले असून यापुढेही भाव वाढतील की नाही याची कोणतीही शास्वती नसल्याची चर्चा व्यापारी वर्गात सूरु आहे तर इतर प्रांतात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने तेथे टमाटे पोहोचणे जिकरीचे झाल्याने भावात वाढ होत नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगत आहे
************************************
अत्यंत महागाची बी बियाणे, औषधें मजुरीचा होणारा खर्च या सर्वांचा विचार करता शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे त्यात या शासनाने शेतीकडे दुर्लक्ष केल्याने अजूनच वाईट दिवस शेतकऱ्यांवर आले आहे शेतकरी वाचवायचा असेल तर या सरकारने लवकरात लवकर पावले उचलणे गरजेचे आहे
बापूसाहेब शेलार
प्रगतीशील शेतकरी,विखरणी
************************************
थोडे नवीन जरा जुने