धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण त्वरीत लागु करावे,

 
धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण त्वरीत लागु करावे, 
येवला - प्रतिनिधी

धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण त्वरीत लागु करावे, या मागणीचे निवेदन धनगर समाजाच्या वतीने तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांना देण्यात आले आहे. 
स्वातंत्र्य मिळाल्यापासून धनगर समाज एस. टी. आरक्षणाची मागणी करीत आहे व त्यास सर्वच सरकार फक्त आश्‍वासन देवून समाजाची फसवणूक करीत आहे. तसेच भाजपा सरकारनेही समाजाची फसवणूक केली आहे. समाजाची खरी मागणी आहे की, एस. टी. च्या सुचिमध्ये अनुक्रमांक ३६ वर घटनेत ओराण धनगड शब्द होता. तो शब्द आताच्या घडीला धनगर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही भागात धनगड ही जमात नसून तीच धनगर जमात आहे. तेव्हा धनगड शब्द दुरुस्त करुन धनगर असा करण्यात यावा. अशा प्रकारची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे करावी, अशी अपेक्षा धनगर समाजाच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. धनगड शब्द दुरुस्त करुन तो धनगर झाला तर त्याचा प्रत्यक्ष लाभ धनगर समाजाला एस. टी. च्या सवलतीचा लाभ मिळेल असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाने या मागणीचा विचार न केल्यास जिल्हाभर धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी डॉ. सुधीर जाधव, कांतीलाल साळवे, बबनराव साळवे, गणपत कांदळकर, ऍड. शंतनु कांदळकर, डॉ. प्रितम वैद्य, दत्तु देवरे, लक्ष्मण कांदळकर, पप्पु जानराव, दिपक जानराव, शिवाजी जाधव, शिवाजी व्यापारे, नवनाथ कांदळकर, प्रविण जानराव, चिंधु गोराणे, कचरु वनसे, किसन वनसे, भाऊसाहेब गायकवाड, प्रकाश व्होंडे, राजेंद्र जानराव, चंद्रकांत पळसकर आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने