एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनेट ऑफ थिंग्ज वर टिप्स




 

एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनेट ऑफ थिंग्ज वर टिप्स

 


येवला. : प्रतिनिधी

 बाभुळगाव येथील एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनेट ऑफ थिंग्ज

या विषयावर विध्यार्थ्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.यावेळी अनेक टिप्स विध्यार्थ्यांना याविषयी मिळाल्या.

माहिती आणि तंत्रज्ञान विभागामध्ये याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरील सेमिनार व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. याचाच भाग म्हणून ई.एस.डी.एस नाशिक या नामांकित कंपनीतील माहिती तंत्रज्ञान अभियंते योगेश भालेराव व सोमेश शिंदे यांच्या

उपस्थितीत हि कार्यशाळा झाली.इन्टरनेट जगाची महत्वाची गरज बनल्याने या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन व निर्मितीला मोठा वाव आहे.विध्यार्थ्यानी आहे त्यापेक्षा नवीन काहीतरी वेगळे शोधून स्वतला शिद्ध करावे असे यावेळी भालेराव,शिंदे यांनी सांगितले.

सेमिनारसाठी तृतीय व चतुर्थ वर्षातील मुलांची उपस्थिती होती. माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व शिक्षक सदर सेमिनार साठी हजर होते.उदघाटनपर भाषणामध्ये प्राचार्य डॉ.एच.एन. कुदळ यांनी अश्या कार्यक्रमातून विध्यार्थ्यांना बदलती स्थित्यंतरे व नवे आव्हाने याविषयी माहिती मिळते.त्याच साठी प्रत्येक विषयातील जाणकारांचे मार्गदर्शनपर  व्याख्याने आयोजित केली जातात असे सांगितले. माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.पी.पी. रोकडे, प्रा. ए.आय.वाघमारे, प्रा.बी.ए.आभाळे व प्रा.एन.एल. शेळके यांनी संयोजन केले.

Yeola 29_5 बाभूळगाव : एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान अभियंते योगेश भालेराव यांचे स्वागत करतांना प्राचार्य डॉ.एच.एन. कुदळ.

Yeola 29_ 6 बाभूळगाव : एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयात मार्गदर्शन करतांना माहिती तंत्रज्ञान अभियंते योगेश भालेराव


 
 
 

थोडे नवीन जरा जुने