खासदाराकडून शेळके कुटुंबियांचे सांत्वन.
21 वर्ष देश सेवा करणारा जवान आत्महत्या करू
शकतो का ?
येवला : प्रतिनिधी
मानोरी येथील जवान दिगंबर माधवराव शेळके यांच्या कुटुंबियांची खासदार हरीचंद्र चव्हाण यांनी बुधवारी ( दि.26 ) भेट घेऊन सांत्वन केले.आणि घटना कशी घडली याची माहिती जाणून घेतली.
यावेळी जवान दिगंबर शेळके यांचे मेहुणे सचिन खटकाळे यांची दिगंबर यांच्या विरुद्ध मोठे कारस्थान रचून हत्या केली गेल्याचा आरोप केला आहे.21 वर्ष कर्तव्य दक्ष देश सेवा करणारा माणूस आत्महत्या करू शकतो का ? असा प्रश्न शेळके कुटुंबीयांनी उपस्थित केला. तेजपुर ( आसाम ) च्या बटालियन ओसीई 30 मध्ये आपली कर्तव्यदक्ष सेवा बजावत असताना 1 महिन्यांपूर्वी स्टोअर विभागाचा चार्ज देताना संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दबाव दिगंबर शेळके वरती टाकला होता.स्टोअर चा चार्ज ताब्यात घेण्याआधी या स्टोअर मध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूचा घोटाळा ,अफरातफर झालेली होती. त्यामुळे दिगंबर शेळके यांच्या कडे मोठ्या जबरदस्तीने स्टोअर चा ताबा दिल्यानंतर या विभागात 2014 पासून मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दिगंबर शेळके यांनी याची माहिती पत्नी अनिता शेळके आणि मेहुण्यांना दिली होती. तसेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या घोटाळ्याची माहिती सांगितली होती. परंतु या स्टोअर विभागातील घोटाळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच हात असून या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच माझ्या पतीचा घातपात घडवून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप पत्नी आणि मेहुणे सचिन खटकाळे यांनी केला असून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी ही माहिती तात्काळ गृहमंत्री यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता सीआरपीएफ जवान दिगंबर शेळके यांची आत्महत्या नसून त्यांच्या सोबत मोठा घातपात करून हत्या करण्यात आलेली असल्याचा आरोप शेळके कुटुंबीयांनी केला असूनच्या परिवाराला या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून शेळके कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी दूरध्वनीवरून गृहमंत्र्यांशी केली आहे. यावेळी जवान दिगंबर यांच्या वारसांना शहीद पश्चात मिळणाऱ्या सर्व शासकीय सेवेचा लाभ मिळावा,संबंधित अधिकाऱ्यांवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा,दिवंगत दिगंबर शेळके याना शहीद चा दर्जा मिळावा, केंद्रीय गृह खात्याकडून सखोल चौकशी करावी अशी मागणी अनिता शेळके यांनी निवेदनाद्वारे खासदारांकडे केली आहे.
यावेळी शिवसेना नेते छगन आहेर,बाबासाहेब तिपायले, विजय मोरे,तलाठी दत्तात्रय टिळे, रवी आहेर,राजेंद्र शेळके,भाऊसाहेब फापाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिवंगत दिगंबर शेळके कुटुंबियांचे सांत्वन करताना