बल्गेरियाच्या पथकाची मायबोली विद्यालयास भेट

बल्गेरियाच्या पथकाची मायबोली विद्यालयास भेट 


येवला : प्रतिनिधी
समता प्रतिष्ठान येवला संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयास नुकतीच बल्जेरिया येथील सामाजीक कार्यकर्ते गेरी जर्जना व युकेच्या हुलूसी बाटी यांनी नुकतीच भेट दिली .शाळेचे कामकाज      
 पाहून समाधान व्यक्त केले .कर्णबधिरांसाठी साईन लँग्वेजची उपयुक्तता व  महत्व येथील मुलांना व शिक्षकांना पटवून दिले .समता प्रतिष्ठान ही संस्था शासनाच्या तोकड्या अनुदानावर ग्रामीण भागात करित असलेल्या कामाचे कौतूक केले.याप्रसंगी संस्थेचे संचालक सलिल पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार करून स्वागत केले  मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनीही शाळेच्या वाटचालीची माहिती देऊन प्रास्ताविक केले.आलेल्या पाहूण्यांनी सर्व 110मुलांना चादरीचे वाटप केले. व भविष्यातही विद्यालया स मदतीचे आश्वासन दिले. याप्रसंगी अपंग विकास संघटनेचे राज्य सचिव अनिकेत साळगावकर ,जयसिंग काळे ,येवला येथील अपंग संघटनेचे राहूल बो-हाडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हेमंत पाटील , सुखदेव आहेर ,मंदा पडवळ,संतोष कोकाटे रेखा दुनबळे नितीन कदम रावसाहेब सोनवणे, विजय जाधव, मारूती पगारे,रावसाहेब खराटे कदम शोभा सरला वानखेडे यादी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने